[Marathi] - तख्त (Takhta)

[Marathi] - तख्त (Takhta)

Written by:
Sanjay Sonawani
Narrated by:
Vishakha Sonawale
A free trial credit cannot be used on this title

Unabridged Audiobook

Ratings
Book
Narrator
Release Date
May 2024
Duration
2 hours 29 minutes
Summary
शाहजादा अकबराला आलमगिर औरंगजेबापासून तोडण्याच्या संभाजी महाराजांच्या  प्रयत्नांना अखेर यश मिळते. अकबर दुर्गादास राठोड आणि असंतुष्ट राजपुतांच्या पाठींब्यावर औरंगजेबाविरुद्ध बंड करून स्वत:ला सार्वभौम पातशहा घोषित करतो. संभाजी महाराजांच्या पाठींब्याने राजपूत आणि अकबर आपल्याविरुद्ध एकत्र येणे म्हणजे आपल्या सत्तेला धोका हे ओळखून औरंगजेबाच्या राजकीय चाली सुरु होतात. त्यामुळे अकबराला अनेक आघाड्यावर अपयश येवू लागते.

संभाजी महाराज शेवटी अकबरालाच महाराष्ट्रात यायचे निमंत्रण देतात. अपयशी अकबर शेवटी महाराष्ट्रात येतो. संभाजी महाराजांचा आश्रय घेतो.

आपल्याच पुत्राला फितवले म्हणून चवताळलेला औरंगजेब संभाजीमहाराजांच्या नाशासाठी महाराष्ट्राची वाट धरतो. त्यावेळेस औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करून त्याला कैद करून ठार मारण्याचाही बेत संभाजी महाराज आखतात, पण इकडे रायगडावर खुद्द संभाजी महाराजांच्याच हत्येचा कट शिजलेला असतो. अकबरामुळे तो कट उघडकीला येतो आणि दोषी मंत्री आणि त्यांच्या साथीदारांना हत्तीच्या पायी तुडवून मारले जाते.  

सत्ताभिलाषा, त्यासाठी केली आणि घडवली जाणारी क्रूर नाट्ये एकीकडे तर मानवी स्नेहबंध टिकवण्यासाठी किंवा स्वप्नांच्या पूर्तीसाठी निर्माण केलेली किंवा होणारी भावनाट्ये दुसरीकडे यांच्या संमिश्र खेळातून मानवी प्रेरणा नेमक्या कशा वर्तन करतात याचा शोध घेत ही कादंबरी साकार होते.
Browse By Category
1 book added to cart
Subtotal
$2.00
View Cart